विदर्भ महाविद्यालयात दीक्षांत व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

लोकदर्शन👉
जिवती दि ९ /१ २०२२÷विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे सत्र २०२०-२१ मध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. तसेच महाविद्यालयातून उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करण्याकरिता कार्यरत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ घेण्यात आला . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिवती नगरातील प्रतिष्ठित नागरिक राज्यपाल पुरस्कार प्राप्त माजी पोलीस पाटील श्री. अंतूरामजी वाकळे तर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री मा. सचिन जगताप साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन जिवती उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रंगनाथ जी देशमुख तसेच श्री व्यंकटेश बहुउद्देशीय संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते उद्घाटनिय शब्दात माननीय जगताप साहेबांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक, आर्थिक व वैचारिक तिचे भान ठेवून समाजात वावरले पाहिजे. सामाजिक दायित्वाची जबाबदारी आजच्या सुशिक्षित युवकांनी घेतली पाहिजे.प्रगतिशील समाज घडविण्याच्या दृष्टीने योगदान देणे महत्त्वाचे आहेत. त्या मार्गाने कार्य करण्याची नितांत गरज आहे. तर मा. अंतुरामजी वाकळे यांनी निरंतर कार्यरत राहा तेव्हाच यश आपल्या पदरी पडेल. अपयशाने खचून न जाता तेवढ्याच जोमाने कार्यस सुरुवात करा, विजय तुमचाच आहे असे प्रतिपादन केले. तर प्रास्ताविकात महाविद्यालयाचा सविस्तर लेखाजोखा प्राचार्य डॉ. शाक्य यांनी मांडला.उत्कृष्ट निकालाच्या परंपरेत सातत्याने महाविद्यालय अग्रेसर आहेत. व पुढेही राहील अशी आशा व्यक्त केली. उच्च शिक्षणाकरिता विविध क्षेत्रात भरारी मारणारे विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. यात निसर्गा च. तेलंग ( इंजीनियरिंग) शिवम ग. लांडगे (एमबीबीएस) शुभांगी सु शिंदे (बी. फार्म) श्रेयस भा. पिंपळकर (आय आय टी) तर बारावी विज्ञान शाखेत 85 टक्के गुण घेऊन परिसरात प्रथम आलेल्या योगेश राठोड या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महाविद्यालयात घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ऐश्वर्या कोनाळे प्रथम, प्रीति चव्हाण द्वितीय, तर मायमुन शेख तृतीय यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राऊत तर आभार प्रदर्शन प्राध्यापक तेलंग यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. देशमुख, प्रा. लांडगे, प्रा. साबळे, प्रा. पानघाटे, मस्‍कले,मुंडे, मंगाम, वासाडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *