लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
वडगाव येथील शेतकरी श्री राजू दादाजी निमकर यांच्या शेतातील गोठ्याला दिनांक 06/01/2022 ला आग लागून गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून राख झाली आहे.या आगीत
कापूस 5 क्विंटल रुपये 50000/
रासायनिक खत 6 बॅग रुपये 7500/पेट्रोल पंप 1(स्प्रेपंप)रुपये 10000/चार्जिंग पंप 1 रुपये 2500/स्प्रिंकल नोजल 16 नग किंमत रुपये 16000/पाईप HDP60 नग किंमत रुपये 39000/तीन पत्रे 42 नग किंमत रुपये 23000/व इतर साहित्य कुटार सिमेंट डेरी किंमत रुपये 4000/असे एकूण रुपये 152000/ शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्यांचा तलाठी श्री चीने यांनी शेतात जाऊन पंचनामा केला असून मा. तहसीलदार कोरपना यांना अहवाल सादर केला आहे.
गोठा जाळल्याची माहिती मिळताच सौ कल्पना उत्तम पेचे सदस्या जिल्हा परिषद चंद्रपूर श्री उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर श्री श्रीराम भोंगळे सर श्री अशोक आस्कर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना श्री सुदर्शन डवरे श्री चंद्रशेखर पा येवले श्री कैलाश मेश्राम श्री मुकेश निमकर श्री अनंता निमकर हजर होते गोठ्याची पाहणी केली व शासना कडून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले मा तहसीलदार कोरपना यांना अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले.