लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०५/०१/२०२१ :-* केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सुरु केलेल्या केंद्रीय ई श्रम कार्ड नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घ्या . असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी असंघटित कामगारांच्या नोंदणी अभियान कार्यक्रमात बोलताना केले.
केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी आर्थिक आरोग्य , शैक्षणिक व सामाजिक उन्नति करण्यासाठी केंद्रीय ई – श्रमची कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन करून त्या माध्यमातून सर्व योजना राबविण्याचे तरतूद केली आहे . त्यानुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात नोंदणीच्या अभियानाच्या दि ०५ जानेवारी २०१२ रोजी उद्घाटन कामगार नेते विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते तर दशरथ नंदाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यावेळी विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितीत महिला कामगारांना देऊन सदर योजनेच्या लाभ घेऊन आपले जीवन समृध्दी करावे असे म्हणाले.
प्रारंभी श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रेखा आडकी यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी केले . सदर ई श्रम कार्डची नोंदणी कॉमन सव्र्हस सेंटर कडुन करत आहे .
सदर प्रसंगी राज सुरवसे , पप्पु शेख, मनकुरना गुंड, विद्या शिंदे . आरती भोसले , जिन्नत वांगीकर , पुजा माळगे , अनिता जाधव यांच्यासह अ संघटित महिला उपस्थित होते .
*•••••••••••••••••••••••••••••••••••*
*फोटो :- मॅटर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने केंद्रीय ई श्रम कार्ड नोंदणी अभियान कार्यक्रम प्रसंगी असंघटित महिला कामगारांची नोंदणी करत असताना दिसत आहे यावेळी विष्णु कारमपुरी (महाराज) दशरथ नंदाल , विष्णु कुऱ्हाडकर, राज सुरवसे, रेखा आडकी दिसत आहेत*