By : Mohan Bharti
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अ. भा. सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई होते. प्रमुख पाहुणे म्हणून तमुसचे महादेव पाटील ताजने, उपसरपंच कौशल्या मनोहर कावडे, ग्रा प सदस्य रंजना दिवाकर पिंगे, सुनिता ऋषी उमाटे, सुधाकर पिंपळशेंडे, दत्तू पाटील पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाचा पाया रचला. कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता मुलींना व पाल्यांना शिक्षणाचे धडे देऊन सक्षम केलं पाहिजे अशी प्रेरणा जयंतीनिमित्त घ्यावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला विठ्ठल नागोसे, सुरेश कावडे, शंकरराव फिसके, अशोक पाटील कावळे, गणपत पाटील कुकडे, मनोर कावडे, भाऊराव पाटील कावडे, दत्तू पाटील कुंकडे, सुधाकर वाढई, रामचंद्र कुकडे, श्यामकला कावडे, गिरजाबाई वाढई, मायाताई कावडे, रत्नमला कावडे, रेखा वाढई, माया कुकडे, सुचिता धांडे यासह गावकरी उपस्थित होते.