लोकदर्शन 👉
⭕महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरपना ते वणी रोडचे काम रखडले सरकारने कोरपना ते वणी रोड बैलबंडीचा रोड म्हणून घोषित करावा
श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांची मागणी
कोरपना ते वणी रोड आजच्या परिस्थितीत खूपच खराब अवस्थेत असून बस,ट्रक, मेटॅडोर,कार, मोटरसाइकिल व इतर वाहणे चालविणे कठीण झाले आहे कोरपना,आदिलाबाद, जीवती,राजुरा,गडचांदूर वरून येणाऱ्या वाहनधारकांना वणी चे अंतर खूप कमी पडत असून नागरिकांना सोईस्कर आहे परंतु माहाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे रस्त्याचे काम रखडलेले आहे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यास अडथळा निर्माण होत आहे अभय फाटा येथे अनेक जीनिंग असून वणी, हिंगणघाट,नागपूर, यवतमाळला कापूस,सोयाबीन, तूर व इतर शेती विषयक माल नेने कठीण झाले आहे यामुळे शेतकरी व इतर सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे महाविकास आघाडी सरकारने कोरपना ते वणी रोड बैलबंडीचा रोड म्हणून घोषित करावा कारण आमचे बैल अशा रस्त्याने चालण्यास सक्षम आहे आम्ही बैलबंडीने शेतीविषयक माल नेऊन विकू शकतो जर पंधरा दिवसात रोडची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असे निवेदन माननीय श्री हंसराज अहीर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे दिले आहे रस्ता दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे