By : Mohan Bharti
गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने गोंडपिपरी तालुक्यात २५१५ ग्राम विकास योजना आणि जिल्हा खनिज निधी योजने अंतर्गत मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यात मौजा वेडगाव येथील हनुमान मंदिर ते श्री. धुडसे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे ५० लक्ष रुपये, मौजा पोडसा येथील मुख्य बसस्थानक पासुन ते मुख्य चौका पर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता व नदीघाट पर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम करणे २० लक्ष रुपये, मौजा धाबा येथे प्रभाग ०२ मधील शासकीय जागेत वाचनालय इमारत बांधकाम करणे २० लक्ष रुपये, मौजा भंगाराम तळोधी येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे २० लक्ष रुपये व धनगर/ कुरमार समाज सभागृह बांधकाम करणे २० लक्ष रुपये, मौजा खराळपेठ ते पुरडी हेटी रस्ता बांधकाम करणे ५० लक्ष रुपये, मौजा आक्सापूर येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे २० लक्ष रुपये निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कृ उ बा समितीचे उपसभापती अशोक रेचनकर, तालुका कार्याध्यक्ष नीलम संगमवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष विनोद नागापुरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, महिला तालुकाध्यक्षा रेखा रामटेक, वेडगावचे सरपंच धिरेद्र नागापुरे, पोडसाचे सरपंच देवीदास सातपुते, नरेद्र वाघाडे, आशीर्वाद पिपरे, श्रीनिवास कांदनीरवार, डोनू गरपल्लीवार, अभय शेंडे, सुनील फुकट, संगीता राऊत, साईनाथ कोडापे, रवींद्र पाल, सुनील झाडे, शालिक झाडे, राजू राऊत, महिंद्र कुंघाटकर, बंडू तेल्कापाल्लीवर, अभियंता वैद्य, नैताम यासह गोंडपिपरी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.