प्रगतशील नाभिक युवा मंडळ गडचांदूर यांचा अभिनंदनीय उपक्रम

लोकदर्शन 👉 मोहन भारती

______________________________
*गडचांदुर :* प्रगतशील नाभिक युवा मंडळ गडचांदूर यांच्या माध्यमातून सर्व युवकांनी मिळून आपल्या समाजाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देवुन नाभिक समाजबांधवांनी नवीन वर्षात पदार्पण करुन नवा उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत.
दानपेटी उपक्रम राबवित सामाजिक उपक्रमात सर्वांचा हातभार कसा लागेल याविषयी जागृती केली.
सामाजिक कार्यकर्ते नितीन नागमोते, गजानन दैवलकर, संदीप दरवे, अतुल नागमोते, आकाश चौधरी.उमेश लांडगे ओमप्रकाश नक्षीने, प्रशांत हनुमंते. सोबतच सर्व गडचांदूर प्रगतशील नाभिक युवक यांचे सहकार्य मिळाले.
आनंदाची गोष्ट म्हणजे इतके कार्यशील व्यक्ती आम्हच्या समाजाला लाभले हे या माध्यमातून सिद्ध केलं दुकान तिथं दानपेटी
गडचांदूर शहरातील सर्व सलून दुकानांमध्ये श्री संत नगाजी महाराज यांची प्रतिमा असलेली दानपेटी देण्यात आली. व सर्वाना याचे महत्व समजवून सांगितले.
असेच नव नवीन उपक्रम आपणो सर्वांनी राबवायला पाहिजे. जेणेकरून या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्रित जुडून राहील.
भविष्यात असेच उपक्रम राबवून समाजाला नवीन दिशा मिळेल असे नाभिक युवा शक्ती महाराष्ट्रचे चंद्रपूर जिल्हा सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ कडूकर यांनी व्यक्त करीत. प्रगतशील नाभिक युवा मंडळाचे अभिनंदन केले. समोरील नवीन उपक्रमाला नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here