महाराजस्व अभियान अंतर्गत कोलाम बांधवांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते
प्रमाणपत्रांचे वितरण.

राजुरा :– महाराजस्व अभियान अंतर्गत मौजा पिपळंगाव येथील आदिवासी कोलम बांधवांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात १९ शिधापत्रिका, ५० जात प्रमाणपत्र आणि संजय गांधी निराधार योजना ४ लाभार्थीना शासकीय प्रमापत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, शासन नेहमीच सर्व सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील आदिवासी, कोलाम बांधवांच्या काही समस्या आहेत, रस्ते, पाणी आणि इतर या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण अवश्य पाठपुरावा करून येथे येणाऱ्या काळात सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरिष गाडे, नायब तहसीलदार गांगुर्डे, गाव पाटील रामचंद्र पाटील कुरसंगे, माजी सरपंच रामचंद्र जाबोर, उपसभापती मंगेश गुरनुले, डोनगावकर, पूरवठा अधिकारी गंभीरे, मंडळ अधिकारी साळवे, तलाठी रमेश मेश्राम, राहुल श्रीरामवार, सरिता शेरकर, सोयाम, भिमया अंगलवार यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *