By : Shivaji Selokar
विधान सभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप
मुंबई : विदर्भातील धान उत्पादन शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासकीय विधेयकावरील चर्चेत धान उत्पादकांच्या प्रश्नांबाबत विधानसभेत झालेल्या ते बोलत होते.
भाजपचे सरकार महाराष्ट्रात असताना सरकार धान उत्पादकांच्या पाठीशी उभी होती. परंतु त्यानंतर सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. धानाला बोनसच दिला नाही. विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. आता सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यास ते महाविकास आघाडी सरकारची तीनही चाके पंक्चर केल्याशिवाय राहणार नाही, असा ईशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला.