By : Mohan Bharti
संघटनेची कार्यपुस्तिक व मागण्याचे निवेदन सादर.
राजुरा:– गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स अससोसिएशन च्या वतीने नवनियुक्त कुलगुरू डॉ.प्रशांतजी बोकारे यांचे सोबत आज सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी विविध प्रश्न आणि विविध योजनांवर चर्चा झाली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यंग टीचर्स संघटना कटिबद्ध असल्याचे संघटनेचे मार्गदर्शक डॉ.प्रदीप घोरपडे यांनी सांगितले तर यंग टीचर्स असोसिएशनचे चे अध्यक्ष डॉ.संजय गोरे यांनी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विविध प्रश्न आणि मागण्यां सविस्तर पणे मांडल्या यावेळी कुलगुरू महोदयांनी विविध प्रश्न आणि मागण्या समजावून घेऊन त् संघटनेच्या या सुसंवाद उपक्रमाची कुलगुरूंनी उत्तम प्रतिसाद देऊन प्रशंसा केली आहे. या प्रसंगी संघटनेच्या वतीने कुलगुरू डॉ.बोकारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आजपावेतो यंग टीचर्स संघटनेच्या वतीने केलेली कामे ,निवेदने आणि वृत्तपत्र बातम्या समाविष्ट असलेली कार्यपुस्तिक कुलगुरूंना भेट देण्यात आली.या प्रसंगी येणाऱ्या हिवाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत तसेच आचार्य संशोधनातील नोंदणी जुन्या नियमप्रमाणे करणे,प्राध्यापकांचे थकीत मानधन त्वरित अदा करणे,संशोधन केंद्रावरील सहयोगी मार्गदर्शकांची व विध्यार्थी संख्या वाढविणे,अकॅडेमिक स्टाफ कॉलेज ची स्थापना करणे, व इतर अनेक विध्यापिठ विकासार्थ विविध प्रश्ना बाबतचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. यावेळी निवेदनातील विविध प्रश्न आणि मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी कुलगुरू महोदय यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रश्न त्वरित निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.यावेळी संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रदीप घोरपडे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे,उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते,सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने, डॉ राजू किरमिरे, डॉ सुदर्शन दिवसे महिला आघाडी प्रमुख डॉ.लता सावरकर,डॉ.शरयू गाहेरवार, डॉ.भगवान धोटे, डॉ. व्ही.आर.खुणे प्रा संजय राऊत, डॉ.अभय लाकडे प्रा. अजय निंबाळकर डॉ. राजेंद्र झाडे तथा इतर संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य या सुसंवाद बैठकीसाठी प्रामुख्याने उपस्थित होते