ग्लोरीयस फाउंडेशन राजुराच्या वतीने गरजू विधवांना साडी, लगुड्याचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा येथील रामनगर वार्डचे रहिवासी सुरेश लोखंडे या समाजसेवी भावनेने काम करणाऱ्या तरुणाने समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी आपल्या ग्लोरीयस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राजुरा शहरातील रमाबाई नगर, इंदिरा नगर, सोनिया नगर अशा भागात राहणाऱ्या अनेक गरजू विधवांना स्वखर्चाने साडी, लगुड्याचे वितरण केले. कुठलीही मोठी पार्श्वभूमीवर नसताना फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात का होईना स्वखर्चाने गरजूंना मदत करण्यात त्यांने पुढाकार घेतला याबद्दल सर्वांकडून या उपक्रमांचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी राजुरा नगर परिषदेचे बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, अॅड चंद्रशेखर चांदेकर, सतीश नागापुरे, बसंत डहाटे, सुरेश गोलेवार, अमित बिश्वास यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रमाबाई नगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात अनेक गरजू विधवा महिलांनी लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here