मोहन। 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे देशाचे पहिले कृषिमंत्री, तथा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता चिताडे
होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच. बी. मस्की, शोभा जिवतोडे, एम,सी व्ही, सी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे,जेष्ठ प्रा. प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते.
सर्वप्रथम अतिथी च्या हस्ते डॉ, पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी प्राचार्या स्मिता चिताडे,यांनी अध्यक्षीय भाषणातुन कृषी क्रांती चे जनक डॉ पंजाबराव देशमुख यांचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय करावा, असे सांगितले, याप्रसंगी प्रा, अशोक डोईफोडे यांनी प्रास्तविक मधून डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, प्रा, माधुरी पेटकर व प्रा, रोशन मेश्राम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले संचालन प्रा. माधुरी पेटकर यांनी केले. तर आभार प्रा. भुमन्ना पत्तीवार यांनी मानले.याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिनविशेष समिती च्या सदस्यांनी तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले,