लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा वॉर्ड वासियांचा इशारा*
घुग्घुस दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामाची काढलेली ई-निविदा नवीन तयार करून वार्ड क्र. चार व पाच येथील दलित वस्ती परिसर समाविष्ट करून पुनर्नियोजन करून काम करण्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना येथील वार्ड वासियांनी दिले.
घुग्घुस नगर परिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत चुकीच्या कामाचे नियोजन करून काम ठरविण्यात आले. वार्ड क्र. पाच येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आंबेडकर नगर दलित वस्ती आहे या दलित वस्तीला विकासा पासून वंचित करून चुकीचे नियोजन केले आहे. तसेच शालिकराम नगर, शिवनगर, राधा कृष्ण मंदिर परिसरालाही विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
घुग्घुस शहरातील वार्ड क्र. चार व पाच मध्ये दलित लोकांची संख्या सर्वाधिक आहे. सन 2015 या वर्षी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या दलित लोकवस्तीच्या आधारावर एससी उमेदवारांच्या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. घुग्घुस नगर परिषदेने वार्ड क्र. चार व पाच मधील दलित वस्तीच्या लोकांना नजर अंदाज करून दलित वस्ती सुधार योजनेच्या चुकीच्या कामाचे नियोजन केले.
ही चूक दुरुस्त करून वार्ड क्र. चार व पाच मध्ये राहणाऱ्या दलित लोकांचा विकास व न्याय मिळण्याकरिता दलित सुधार योजनेचे नवीन नियोजन करून काढण्यात आलेली ई-निविदा नवीन तयार करून शहरातील सर्व वार्डाचे अंदाज पत्रक तयार करून नवीन ई-निविदा काढून घुग्घुस दलित सुधार योजनेचे काम करण्यात यावे अशी मागणी वार्ड वासियांनी निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, विक्की सारसर, प्रशांत लेंडगुरे, रवी बडगुलवार, विक्की भंडारी, योगेश सारसर, अमोल हस्ते, अमन वनकर, शुभम कात्तुलवार, गणेश मोहुर्ले, दिलीप लेंडगुरे, मंगेश मुंजेवार, रुदय तांड्रा, नागेंद्र गिरी, रामनरेश कश्यप, दामोदर मुंजेवार व वार्ड वासीय उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार यांनासुद्धा निवेदन देण्यात आले.