अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत चेहरा! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

लोकदर्शन। 👉 शिवाजी सेलोकर।


_____________________________________

*⭕आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.*

*⭕सुशासनदिनी श्रमिकांना श्रमिक कार्डचे वाटप,जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार व कविता वाचन संपन्न.*

घुग्घुस | शनिवार, दि. २५ डिसेंबर.
देशाचे माजी पंतप्रधान, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आजचा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक जेष्ठ पदाधिकारी महिकाली राजन्ना, पूनम शंकर, वासुदेव ठाकरे, शैलेंद्र कक्कड, निलकंठ नांदे आणि मंदेश्वर पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रमिक बांधवांसाठी केंद्र सरकारतर्फे मोफत देण्यात येत असलेल्या श्रमिक कार्डचे श्रमिकांना वाटप करण्यात आले. यासोबतच श्रद्धेय अटलजींच्या “क्या हार में, काय जीत में, किंचित नहीं भयभीत में” या कवितेचे याठिकाणी वाचन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी हे देशाचे सर्वमान्य नेते होते. पंतप्रधान म्हणून देशाच्या निर्णयप्रक्रियेत, विकासप्रक्रियेत सर्वांना सहभागी करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. अटलजींच्या माध्यमातुन भारतीय राजकारणाला सुसंस्कृत चेहरा मिळाला. देशातील सर्व धर्म, पंथ, प्रांताच्या बंधु-भगिनींच्या मनात विश्वास निर्माण करणारे अटलबिहारी वाजपेयी जी आदर्श राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. आणि आता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील “अटलजी ते मोदीजी” असा विकासाचा आलेख वृद्धिंगत होतो आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. यासोबतच त्यांनी मोदी सरकारच्या सात वर्षीय लोकहिच्या निर्णयांची, विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जि. प. सभापती नीतू चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, साजन गोहणे, सिनू इसारप, बबलू सातपुते, शरद गेडाम, अनिल मंत्रीवार, विनोद चौधरी, अनंता बहादे, महेश मुक्के, डोमाजी वानखेडे, श्रीधर तग्रवार, शिवम भारती, विजय ठाकरे, नितीन काळे, अशोक नागभीडकर, शंकर मिसाळा, वसंत भोंगळे,विनोद जंजर्ला, झिन्नु कामतवार, अरूण साठे, पियुष भोंगळे, रूक्मिदेवी यादव, तिरुपती कोंडागुर्ला, ज्योती बट्टे, सोनी कैथवास, अनिता श्रीवास, लैजा ठाकरे, सुमार सरोज, आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, लाभार्थी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *