लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।
*⭕अटल बिहारी वाजपेयी हे समस्त राजकीय क्षेत्रात आदर्श व अनुकरणीय नेतृत्व – हंसराज अहीर*
चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर व्दारा आयोजित आज बापुपेठ येथील श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या आदरांजली कार्यक्रमात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी अटलजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी बोलतांना अटलजी भाजपाचे अध्यक्ष म्हणुन त्यांच्या कार्यकाळात भाजपा मोठा पक्ष म्हणुन उभी राहिली. वर्षानुवर्ष जनसंघापासुन सतत कार्यरत राहुन 2 खासदार असलेल्या भाजपाला वटवृक्षाचे स्वरूप आलेले आहे. महान कवी, साहित्यीक आणि देशभक्त अशी त्यांची ओळख होती. जनसंघ ते भाजपापर्यंत कारकीर्द प्रधानमंत्राी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांचे निर्णय हे आम्हा सर्वांना दिशादर्शक आहे असे हंसराज अहीर यांनी सांगीतले.
विरोधकातही त्यांच्याबद्दल आदराचे स्थान होते. जागतिक स्तरावर देशाचे नाव लौकीक करणारे अटलजी त्यांचा जन्मदिवस हा भाजपासाठी मोठा सन आहे. प्रेरणादायी दिवस म्हणुन आज आपण हा दिवस साजरा करत आहो तसेच आज सुशासन दिवस म्हणुन साजरा होत आहे. यावेळी श्री डाॅ. मंगेश गुलवाडे, प्रमोद कडु, राजेंद्र गांधी, अंजली घोटेकर, संदीप आगलावे, विशाल निंबाळकर, पराग मलोडे आदींची उपस्थिती होती.
*कर्तव्यदक्ष आपीएफ पोलीस अधिकाऱ्यांचा हंसराज अहीर यांचेद्वारा सत्कार*
आज श्रध्देय अटलजींच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या सुशासन दिवसानिमित्त चंद्रपूर येथील आरपीएफ च्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या अधिकार क्षेत्रात वर्षभरात जवळपास 600 कि.ग्रॅ. गांजा सोबत 23 तस्करी करणारे आरोपीही पकडले आहे. उत्तर प्रदेशच्या लहान मुलीला अपहरनातुन मुक्त करून तीच्या कुटूंबियांना सुखरूप सोपवीले तसेच 1.75 कि.ग्रॅ. सोने जप्त करून 10 लाखाचे वर प्रवाशांचे चोरी केलेले साहित्य पकडले अशा उत्कृष्ट कामगिरी बद्दल आरपीएफ चे वरीष्ठ अधिकारी श्री. एन.पी. सिंग यांच्यासह अन्य रेल्वे पोलीसांचा सन्मान हंसराज अहीर यांनी केला. यावेळी चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीचे दामोदर मंत्राी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.