By : Mohan Bharti
नांदा : श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा तह कोरपना येथे दिनांक 22//12/2021 ला थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिवसा निमित्य गणितोत्सव मध्ये गणितीय शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनी आयोजीत केली यात विद्यार्थ्यांनी गणित साहित्य प्रतिकृति तयार केल्या विवीध रांगोळीच्या माध्यमातून गणित विषयाचे महत्व पटवून दिले या प्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य डॉ अनिल मुसळे साहेब यांनी केले त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकृती बघून प्रश्न विचारले आणि उत्तरे जाणून घेतली प्रदर्शनिचे उत्तम आयोजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि अशा प्रकारची प्रदर्शनी आम्ही पहिल्यांदाच पाहात आहोत असे विचार प्रकट केले विद्यार्थ्याची गणित विषयात आवड निर्माण व्हावी आणि गणिताचा पाया पक्का व्हावा व पायाभूत संख्या ज्ञान पक्के व्हावे त्याकरीता असे उपक्रम महत्वाचे आहेत अशी शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रसंशा केली उपक्रम आयोजक प्रा स्वप्नील दुमोरे गणित शिक्षक व्यवस्था नियोजन मार्गदर्शन तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहीत्य तयार करण्यासाठी खुप मेहनत केली आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिपाई यांनी सहकार्य केले