By : Mohan Bharti
शेखर धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.
राजुरा :– चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. तर्फे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर उपचारा करीता ऐका शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात आली. या लाभार्थींना शेखर धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यात राजुरा येथील शेतकरी इंद्रजित साखरकर यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर वरील वैद्यकीय उपचारा करीता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूर तर्फे रूपये ३० हजार रुपयाची अर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूरचे सदस्य राजुरा न प चे उपाध्यक्ष श्री सुनिल देशपांडे, राजुरा शाखेचे शाखाधिकारी सुधीर वामखेडे, उपनिरीक्षक श्री विजय भोयर उपलेखपाल गणेश उलमाले उपस्थित होते, यासह लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.