लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕विधानसभेत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी*
चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या ३० वर्षात ए. सी. सी कंपनीने लाईनस्टोनच्या अवैध उत्खनन व ओव्हरलोडच्या माध्यमातून करोडो रुपयांचा महसूल बुडविलेला असून , परिसरातील शेतमालाचे, नागरिकांच्या आरोग्याच्या नुकसानीबद्दल व भ्रष्ट व्यवहाराबाबत कंपनीवर सी. बी. आय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान भवनात तारांकित प्रश्नावर चर्चेदरम्यान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एसीसी कंपनीने सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षात सिंदोला लाईमस्ट्रोन खाणीत उत्खननाचे प्रस्तावित प्रमाण २९ लाख ८७ हजार ९२८ टन आहे. सध्या २३ लाख ९१ हजार ३९६ टन व भरलेली रॉयल्टी १९ करोड १३ लाख ११ हजार ६८० रुपये याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आकडेवारी दिली आहे. परंतु हि प्रत्यक्षात आकडेवारी दिशाभूल करणारी असून मागील ५ वर्षात १०० लाख टन असून या गंभीर प्रकरणाची सी. बी. आय मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग असून येथील उद्योगांना पाठीशी घालण्याचे काम येथील अधिकारी करीत आहेत. जिल्ह्यात लाईमस्टोनच्या अवैध उत्खनन व ओव्हरलोडच्या माध्यमातून करोडो रुपयांचा महसूल बुडविलेला असून , परिसरातील शेतमालाचे नुकसान तसेच नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून देखील मंत्री महोदयांना चुकीची माहिती येथील अधिकाऱ्यांनी पुरविली आहे.अधिकाऱ्यांनी जी आकडेवारी दिली, ती वास्तविकता नसून संबंधित कंपनीबाबत अनेकदा पत्रव्यवहार, बैठकीची मागणी, मार्गदर्शन व कार्यवाही याबाबत लक्ष वेधण्यात आले. तरीदेखील नातेगोते जपण्याच्या नादात या गंभीर बाबीकडे दूर केले जात असल्याची खंत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.