महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्याचा) येथे मँराथान स्पर्धा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर:
महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्याचा) येथे नुकतेच मँराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत कवठाळा चे सरपंच नरेश सातपुते,यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव चे सरपंंच विजय निखाडे उपस्थित होते. यावेळी विजयी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल तेलसे यांनी तर आभार शामकांत पिंपळकर यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीते साठी विजय डाहुले, गिता वाकडे, संजय थेरे, मनोहर चौधरी यांनी सहकार्य केले.स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *