कोरपना येथे भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर काँग्रेस नेत्यांकडून प्राणघातक हल्ला

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


  • ⭕*विजय बावणे व नितीन बावणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल*

कोरपना नगरपंचायतची रणधुमाळी सुरू असून आज २१ डिसेंबर ला मतदान होत आहे.या निवडणूकीत भाजपा,शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना मित्र पक्षाकडून शहर परिवर्तन आघाडी विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस थेट लढत आहे.

यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांची कोरपना नगरपंचायत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये आज शहरात मतदान असताना काँग्रेस कार्यकर्त्यांना पराभव दिसत असताना काल रात्री शहरात काँग्रेस नेते विजय बावणे व नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन कोरपना शहरातील नागरिकांना दिसून आले आहे.

तसेच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे कोरपना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी विरुद्ध कलम १४३,१४७,३२३,३४१,४४७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.परंतू अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही ठरावी अशी मागणी कोरपना शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *