लोकदर्शन👉 मोहन भारती
*कोरपना: अखिल कोरपना तालुका प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोरपन्याच्या वतीने तालुकाध्यक्ष कैलाश मस्के यांच्या नेतृत्वात जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत तहसीलदार कोरपना यांचेमार्फत मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.*
*निवेदनात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ,शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवावे ,नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात(समुह शाळा, स्वयंसेवक नेमणूक, पुर्व प्राथमिक वर्गासाठी अप्रशिक्षित शिक्षक नेमणे),सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ,खंड दोन प्रकाशित करण्यात यावा,जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी,शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी,शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी,संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी,पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी,शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा,वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासून सेवा धरुन वरीष्ठश्रेणीचा लाभ द्यावा,केंद्रप्रमुख पदे १००% शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्यात यावे,निवासी व्यवस्था होत नाही तोपर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी.*
*निवेदन देताना चंद्रकांत पांडे,वसंत गोरे,घनशाम पाचभाई,लहुजी नवले,महादेव मुनावत, तेजस कामतवार,हरीश आडे,राकेश गोणेलवार, नामदेव जाधव,अनिल खोकले,रमेश महल्ले,मधू चव्हाण,नागोराव धोत्रे, गजानन चव्हाण,राजेश धांडे,जंगू रायसिडम, रमेश टेकाम, मेहरबान राठोड,प्रदीप नागोसे,संतोष गदेकर,प्रवीण वानखेडे,मारोती आडे,शेषरावं येरमे,बालाजी म्हेत्रे,ज्ञानेश्वर बुधवंत, गजानन तिडके, उमेश आडे,सत्यविजय मडावी, जगदीश घोटकर,विलास किन्नाके, सुरेश बोबडे,निलेश कुमरे,संपत बनसोडे,भालचंद्र कोंगरे उपस्थित होते*