By. 👉 Shankar Tadas
*⭕पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते होणार सहभागी*
*⭕काँग्रेसतर्फे भव्य पदयात्रेद्वारे जनजागरण*
नागपूर, दि. १७ डिसेंबर २०२१ :- गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांना घेऊन नागपूरात काँग्रेसने पदयात्रेचे आयोजन १८ डिसेंबर २०२१ रोजी केले आहे. पदयात्रेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित राहुन मोदी सरकारच्या चुकिच्या धोरणाचा विरोध करणार आहेत.
पदयात्रा बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयातून सकाळी ११ वाजता सुरू होणार असून दहा नंबर पुलिया, कमाल चौक, आवळे बाबू चौक मार्गाने भ्रमण करून बेझनबाग येथे संपन्न होणार आहे.
उद्या निघणाऱ्या पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आव्हान रत्नाकर जयपुरकर, उपाध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.
श्री. रत्नाकर जयपुरकर
उपाध्यक्ष, नागपूर शहर काँग्रेस कमिटी
मो. नं. 9422805333