लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕राजुरा येथे विविध क्रीडा सुविधांचे लोकार्पण.
राजुरा (ता.प्र) :– तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे विविध क्रीडा सुविधांचा लोकार्पण सोहळा क्षेत्राचे आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. राजुरा तालुक्यातच नव्हे तर राजुरा विधानसभा क्षेत्राच्या चारही तालुक्यात वैशिष्ट्यपूर्ण, अत्याधुनिक सुविधा संपन्न असे तालुका क्रीडा संकुल निर्मिती हे माझे स्वप्न असून प्रत्येक तालुका क्रीडा संकुल परिसरात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे विविध क्रीडा सुविधांचे लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या प्रसंगी २०० मिटर रनिंग ट्रेक, बास्केट बॉल, अत्याधिक बँटमिन्टन फोर्ट, ओपन जिम अशा विविध सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. येणाऱ्या काळात येथे अनेक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, तहसीलदार हरिष गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड, तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाले, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, दारवनकर, संदीप उईके, प्रशिक्षक पाशा शेख, सचिव योगिता मटाले, स्वाती घोटकर, अशोकराव देशपांडे, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अशोक राव, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, अॅड चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, सारंग गिरसावळे, मतीन कुरेशी, चेतन जयपुरकर, धनराज चिंचोलकर, इर्शाद शेख, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, शुभांगी खामनकर, सुप्रिया गेडाम, विना गोप, कल्पना मेशट्टीवार, मंगला हांडे यासह छत्रपती क्रीडा अॅकाडमीचे विद्यार्थी, शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.