By : Mohan Bharti
*बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंतरोग तज्ञ याद्वारे शेकडो रुग्णावर मोफत उपचार
गडचांदूर : अर्थ फाउंडेशन जीवती तसेच टाटा ट्रस्ट आणि आरुन्य चंद्रपूर , ग्रामपंचायत कारगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवति तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल कारगाव( खू) येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान व उपचार शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी तसेच महिलांच्या आरोग्य तपासणी दंतरोग तज्ञ मुखरोग तज्ञ यांच्याद्वारे दातांच्या आजाराची तपासणी तसेच कॅन्सर शुगर बीपी या रोगांचे निदान करून उपचार करण्यात आला , या प्रसंगी आरोग्य जनजागृति करण्यात आली आणि कोविड लसीकरण बद्दल पथनाट्य सादर करण्यात आले . या शिबिरात शेकडो रुग्नानी लाभ घेतला . यामधे बालक , महिला , 30 वर्षा वरील व्यक्ति उपस्थित होते. याप्रसंगी शिबिराचे मुख्य संयोजक अर्थ संचालक डॉ. कुलभूषण मोरे , डॉ.समृद्धी वासनिक (बालरोगतज्ञ) डॉ. रामटेके (दंतरोग तज्ञ )डॉ.आशिष बारबदे(टाटा ट्रस्ट) डॉ. प्रदिप रॉय ( GMC चंद्रपुर) हे सर्व तज्ञ डॉक्टर आणि गणेश ढगे (अर्थ cordinatar) , सालुंखे सर (टाटा ट्रस्ट) , उपस्थित होते तर आरोग्यदूत धर्मा मडावी , हनुमान क्रीडा मण्डल चे संजय सिडाम , गजानन पेंदोर,तानाजी उइके , टेम्भुर्ने आरोग्य सेवक , अविनाश शर्मा (फार्मासिस्ट) यानी शिबिर व्यवस्थापनचे कार्य केले .
अर्थ फाउंडेशन जिवती सारख्या दुर्गम तालुक्यातील दुर्लक्षित गावामध्ये आरोग्य सेवा चे कार्य निस्वार्थी पणे करीत आहेत, हजारो रुग्णांना आरोग्य सेवा चा लाभ मिळत आहे, विशेष करून कुपोषित बालकांना आरोग्य शिबीर संजीवनी ठरत आहे,
,,,डॉ, समृद्धी वासनिक,
बालरोगतज्ज्ञ, मेडिकल कॉलेज, चंद्रपूर,,