By : Mohan Bharti
गडचांदूर : शिक्षण हे प्रत्येक मुलांचे मुलभूत हक्क आहे. त्यामध्ये मुल, जात, लिंग आणि वर्ण या बाबीव्दारे भेदभाव करता येत नाही. बालकांचा मोफत व सक्तिचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्रत्येक बालकांस मूलभूत शिक्षणचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये दिव्यांग विदयार्थ्याला सुध्दा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यात सुरु आहे व नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुध्दा एकात्मिक शिक्षणावर भर देण्यात आली आहे.
3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन व 3 ते 9 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी / सप्ताहाचे औचित्य साधून पंचायत समिती, कोरपनाने येथील विविध शाळांमध्ये दिव्यांग मुलांचे शैक्षणिक, भौतिक आणि सामाजीक समावेशन तथा पुनर्वसन होण्याच्या अनुषंगाने, समाज प्रबोधान, प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फॅन्सी र्डेस, धावणे इ. प्रकारचे उपक्रम राबवून दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला व अपंग / दिव्यांग व्यक्तीचे समाजातील स्थान व समाजाची भूमिका यावर जन प्रबोधन करण्यात आले.
सदर उपक्रम / सप्ताह चांगल्या रितीने साजरा करण्याकरीता श्री आनंद राजु धुर्वे, गटशिक्षणाधिकारी, श्री रुपेश कांबळे, वि.अ.(शिक्षण), श्री सचिन मालवी, वि.अ.(शिक्षण) यांनी मोलाचे मार्गदर्शक केले. सर्व केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील शाळेमध्ये सप्ताह साजरा करण्याबाबत सनियंत्रण केले.
तसेच तालुक्यातील शाळांमध्ये जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्याकरीता शाळांचे नियोजन श्री फयाज शेख, व श्री रजनीकांत सुसकिरे, समावेशित तज्ञ यांनी केले. फिरते विशेष शिक्षक यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मोलाचे सहकार्य केले.