लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर – युगचेतना ग्रामविकास बहूद्देशीय संस्थे द्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव मा. श्रीपाद अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण अतिदूर्गम भागातील प्रशासकीय सेवेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा महाविद्यालयातील अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असून विविध स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी करावी आणि आपले इप्सित साध्य करून यशस्वी व्हावे, असा सल्ला श्री श्रीपाद अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदेवराव ठेंगणे होते तर मंचावर विजय जामनकर, योगेश चौधरी,प्रा.राहूल ठोंबरे,प्रा. दिनेश गुरनुले,प्रा. प्रवीण पाझारे, अरविंद मुसणे,संतोष पाल आदी उपस्थित होते.विद्यार्थी संवादानंतर विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.