सावली येथील कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांचा भाजपात प्रवेश*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।


⭕*नगर पंचायत निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार.*

सावली कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे माजी संचालक, व्‍यापारी संघटनेचे अध्‍यक्ष, माजी ग्राम पंचायत सदस्‍य तथा कॉंग्रेस पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते श्री. प्रविण सुरमवार, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या नगरसेविका, ओबीसी नेत्‍या सौ. निलम निखील सुरमवार, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते निखील सुरमवार, कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. साकेत रामभाऊ शेंडे तसेच राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे मिथुन प्रकाश सुरमवार, सावली केवट समाजाच्‍या नेत्‍या अमिता गद्देकार, माळी समाजाचे नेते संतोष कोटरंगे, यांनी भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश घेतला.

माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या नेत्‍यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. सावली नगर पंचायतीच्‍या निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी कॉंग्रेस या दोन्‍ही पक्षांना मोठे खिंडार पडले आहे.

यावेळी भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपुरे, भाजपा महिला आघाडी चंद्रपूर ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्षा कु. अल्‍का आत्राम, सुहास अलमस्‍त, भाजपा सावली तालुका अध्‍यक्ष अविनाश पाल, ज्‍येष्‍ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य संतोष तंगडपल्‍लीवार, सावली शहर भाजपाध्‍यक्ष आशिष कार्लेकर, राकेश विरमलवार, गौरव संतोषवार, मयुर व्‍यास, आदर्श कुडकेलवार, वसिम शेख, कृष्‍णा राऊत, नामदेव भोयर, आशिष गेडाम, अविनाश चल्‍लावार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

२१ डिसेंबर रोजी होणा-या सावली नगर पंचायतीच्‍या निवडणूकीत आ. सुधीर मुनगंटीवार, प्रा. अतुल देशकर यांच्‍या नेतृत्‍वात या नगर पंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्‍याचा निर्धार नवप्रवेशित नेत्‍यांनी केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *