By : Mohan Bharti
गडचांदूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान असून त्यांच्या महत्त्व पुर्ण योगदानामूळे च सर्व गोरगरीब मुलांना व मुलींना शिक्षणाची दारे उघडी झाली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेऊन गोरगरीब, वंचित दलित लोकांची सेवा केली तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे प्रभारी कुलसचिव तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ अनिल चिताडे यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलतांना केले,
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे,प्राचार्या स्मिताताई चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार ,पर्यवेक्षक अनिल काकडे,हनुमान मस्की,शोभाताई जीवतोडे होत्या,
सर्व प्रथम डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी प्रा, आशीष देरकर यांच्या कडून शाळेला व संस्थेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदेश देणाऱ्या भव्य प्रतिमा भेट दिल्या, प्राचार्या स्मिता चिताडे यांनी त्या स्वीकारल्या,याप्रसंगी
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, अनिल चिताडे यांचा वाढदिवस पुष्पगुच्छ देऊन केक कापून साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनूरवार,यांनी केले, संचालन व आभारप्रदर्शन प्रा, आशिष देरकर यांनी केले, कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,