By : Mohan Bharti
गडचांदूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेणगाव येथे दिनांक 3 डिसेंबर 2021 ला जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा फॅन्सी ड्रेस चेंडूचे खेळ अशा विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना समान संधी देऊ या, प्रत्येकाचा विकास करू या. या उक्तीप्रमाणे व संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या न्यायाने जगातील प्रत्येक बालकाला सामान्य बालकाप्रमाणे जीवन जगण्याचा व स्वतःचा विकास साधण्याचा अधिकार आहेत हा दिवस अपंग व्यक्ती बाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केल्या गेला. उपस्थित विद्यार्थ्यांना थामस अल्वा एडिसन, लुईस ब्रेल, हेलन केलर इत्यादींचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष प्रेमदासजी राठोड, उद्घाटक म्हणून बंडू बोबडे मुख्याध्यापक हे होते. मार्गदर्शक म्हणून प्रतिक गुडे पवार आय. आय.डी., बी.आर.सी.जिवती, दत्ता गोतावळे विशेष शिक्षक सीआरसी टेकामांडवा, कुमारी ज्योती आत्राम विशेष शिक्षक, सीआरसी पाटण उत्तम देवकते विशेष शिक्षक सीआरसी शेणगाव, संग्राम केंद्रे विषय शिक्षक, वसंतराव जाधव विषय शिक्षक बाबा कोडापे विषय शिक्षक, नरेंद्र वनकर सहा.शिक्षक, सौ.धरती टिपले सहा. शिक्षिका, कुमारी मिनाक्षी कुमरे सहा.शिक्षिका, कुमारी माधुरी मडावी सहा.शिक्षिका, कुमारी शितल सोलंकर सहा. शिक्षिका व दिव्यांग विद्यार्थी बादल नागोराव राठोड, गौरी बबन शेंबडे, रोहन दत्ता घोडके व दिव्यांग विद्यार्थ्यांचे आई सौ. उषा नागोराव राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमाला चरणदास कोरडे विस्तार अधिकारी व संजय बोबडे केंद्रप्रमुख यांनी शुभेच्छा देत प्रेरणा दिली मार्गदर्शक संग्राम केंद्रे प्रतिक गुडे पवार, उत्तम देवकते यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन बाबा कोडापे यांनी केले तर आभार कुमारी ज्योती आत्राम यांनी मानले.