लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांसह अन्य सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जुन्या पेन्शनयोजनेसह, उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी 22 नोवेंबर 2021 पासून जुनी पेन्शन संघर्ष यात्रा सुरू असून या न्याय हक्काच्या मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने या जुनी पेन्शन संघर्ष यात्रेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असून या प्रश्नाकडे शासन लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी ही जुनी पेन्शन संघर्ष यात्रा 22 नोवेंबर 2021 पासून मुंबईतील आझाद मैदानातून प्रारंभ झाली आहे.ही जुनी पेन्शन संघर्ष यात्रा 6 डिसेंबर रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत आहेत. ज्या बांधवांना पेन्शन नाकारली जात आहे अशा शिक्षकासह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी या संघर्ष यात्रेत सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादित करून या पेन्शन संघर्ष यात्रेला गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशन जाहीर पाठिंबा दिला आहे. शिक्षकांच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित व मूलभूत हक्काच्या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील शिक्षक व प्राध्यापकांनी सदर संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशन चे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय गोरे सचिव प्रा.डॉ. विवेक गोरलावार तथा संघटनेचे सर्व उपाध्यक्ष. सहसचिव,कोषाध्यक्ष व सर्व विभाग समन्वयकांनी केले आहे