माणिकगड सिमेंट कंपनीतून सोलर प्लेट्सची चोरी,,आरोपीला अटक,,                                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
बंगाली कॅम्प परिसरात काही दिवसांपासून माणिकगड सिमेंट कंपनीचे सोलर प्लांटचे काम सुरू आहे. 26 नोव्हेंबर रोजी काही अज्ञात चोरट्यांनी तेथील सात सोलर प्लेट्स चोरून नेले. यासंदर्भात प्राप्त तक्रारीनंतर गडचांदूर पोलिसांनी कलम 380 नुसार गुन्ह्याची नोंद केली. ठाणेदार सत्यजित आमले यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहायक फौजदार सुनील बोरीकर, पोलीस शिपाई संदिप थेरे यांनी कसून तपास करून बंगाली गडचांदूर येथील आरोपी राकेश मंडल (30) याला अटक करून त्यांचे त्यांच्याकडून अंदाजे वीस हजार रुपये किमतीचे तीन सोलर प्लेट्स जप्त केले आहे. उर्वरित प्लेट्स व इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *