लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर च्या वतीने दि ०१ डिसेंबर २०२१ रोजी जागर अभियान अंतर्गत चंद्रपूर येथे आयोजित भव्य ओबीसी मेळावा काही अपरिहार्य कारणास्तव स्थगीत करण्यात आलेला आहे. याची भाजप व ओबीसी मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधवांनी दखल घ्यावी ही विनंती. पुढील मेळाव्याची तारीख आपणांसह यथावकाश कळविण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी. विनीत : भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर.