By : Mahadev giri
वालुर : वालुर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मागील दोन वर्षा पासुन कोरोना काळात दिवसरात्र कोरोना रुग्णासाठी झटणारे वालुर ग्रामपंचायत कार्यायाचे सरपंच संजयजी साडेगावकर, ग्रामपंचायत कर्मचारी,प्राथमिक आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,वालुर येथील सर्व खाजगी डाक्टरस,वालुर येथील सर्व मेडिकल धारक, जुने व नवीन पोलिस कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्तत्या ,मदतनीस, आशा वर्कर्स, जि.प.शाळेतील सर्व शिक्षक, प्राथमिक जि.प.शाळा, केंद्रीय जि.प.शाळा वालुर, वालमिकेशवर माध्यमिक विद्यालय वालुर, ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय वालुर,श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रम शाळा तसेच महाविद्यालयातील कर्मचारी, लाईन विज वितरण सेवेत असलेले कर्मचारी व पत्रकार यांनी विविध समयी चेकपोस्ट डयुटि,लसीकरण, लसिकरणासंदर्भात विविध सरवेकशन करणे, योग्य उपाय योजना ग्रामपंचायत मारफत लावणे आदिसह विविध कामात वरील सर्व कर्मचाऱ्यांनी खुप परीश्रम घेऊन कोरोना रोगास दुर ठेवल्या बद्दल वालुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दि.30 आँकटोंबर मंगळवारी वालुर येथे कोरोना क्रतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वालुरचे सरपंच संजयजी साडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सरला गाडेकर मँडम, वैद्यकीय धिक्षक संजय हरबडे,आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे ,केंदप्रमुख डि.बि लगड, ग्रामविकास अधिकारी सि.एन.कुवर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी मान्यवरांच्या हस्ते धनत्रयोदशी देवीच्या प्रतिमेचे पुजन करण् करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.यावेळी डॉ. संजय हरबडे, आरोग्य विस्तार अधिकारी धायडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सरला गाडेकर,सरपंच संजय साडेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेश साडेगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले.
याप्रसंगीकोरोना काळात प्राणपणाने कामकरणारे प्राथकमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉकटरस,सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी, जुने व नवीन पोलिस कर्मचारी, अगंणवाडि कार्यक्रत्या ,मदतनीस, आशा वर्कर्स, जि.प. माध्यमिक शाळा, केंद्रीय कन्या शाळा, वालमिकेशवर माध्यमिक शाळा, ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय,शांताबाघ नखाते प्राथमिक विद्यालय ,शांताबाई नखाते महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर कर्मचारी, व पत्रकार आदिंचे प्रमाणत्र ,शाल ,श्रीफळ,पुष्पहार, व सन्मान चिन्ह देऊन सर्व कोरोना योध्यांचा यावेळी ग्रामपंचायत कार्यालय व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी सर्व कोरोना योध्यांनी यानंतरही गावातील प्रत्येक संकटासि आम्ही उभे आहोत, असा निर्धार सर्व कोरोना योध्यांनी केला.कार्यक्रमाचा समारोप सरपंच संजय साडेगावकर यांच्या अस्थक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जालिंदर होलगिरे यांनी केले तर आभार आर.बि .राठोड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश साडेगावकर, नागेश साडेगावकर,शैलेश सुरेंद्रजी तोष्णीवाल ,नारायण आष्टकर,गोपाळ थोरात, बाळासाहेब सोनवणे, गणेश घाटुळ व ईतरांनी परीश्रम घेतले.