लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष
स्थानी प्राचार्या सौ,स्मिता ताई चिताडे होत्या ,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम,सी,व्ही, सी,विभागाचे,प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, जेष्ठ प्रा, प्रफुल्ल माहुरे होते,
सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, संविधान ची शपथ प्रा, रोशन मेश्राम यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिली,याप्रसंगी प्रा, रोशन मेश्राम यांनी संविधान ची प्रत शाळेला भेट दिली, प्राचार्या स्मिता चिताडे यांनी स्वीकारली,
प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनूरवार यानी केले ,संचालन प्रा, नरेंद्र हेपट यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा,विकी ठवरे यांनी केले,
संविधान दिन चे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता ,भारतापुढील सद्य स्तिथीत असलेली आव्हाणे,आणि भारतीय संविधान, या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली, या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, प्रथम क्रमांक कु,शायदा अली,(12 कला) द्वितीय क्रमांक अभिषेक कदम (11विज्ञान)तृतीय क्रमांक अंजली केळझरकर (11 विज्ञान)प्रोत्साहन पुरस्कार रोशन उपाध्याय(12 एम,सी, व्ही, सी)याने पटकाविला,
परीक्षक म्हणून प्रा, संगीता गिरी,व प्रा, सुधीर थिपे यांनी कार्य केले,याप्रसंगी प्रा, रोशन मेश्राम व प्रा, आशिष देरकर यांनी मार्गदर्शन केले
स्पर्धेचे संचालन प्रा, प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, नितीन वाढई यांनी केले,
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,