लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – नजीकच्या बिबी येथील शेतशिवारात १५ नोव्हेंबरला कवडू लक्ष्मण पावडे (६९) या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात शेतीकाम करताना सर्पदंश झाला होता.ब
१५ नोव्हेंबरला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले होते. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात त्यांना स्थलांतरित करण्यात आले. दहा दिवस उपचार करून अखेर बुधवारी त्यांचा सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला.
घरचा कर्ता माणूस गमावल्याने पावडे कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे