By : Mohan Bharti
विहिरगाव येथे काँग्रेसच्या जनजागरण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
राजुरा :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने जन जागरण अभियान राबविण्यात येत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे दिनांक २४ नोव्हेंबर ला सायंकाळी गावातील भजनी मंडळी, शेतकरी, शेतमजूर, युवक, युवती, महिला यांच्या समवेत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. रात्री गावकऱ्यांसमवेत सभा व महिलांचे भजन घेऊन जनजागरण करण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले, बहूत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या सात वर्षाच्या काळात मोदी सरकार ने देशात प्रचंड नुकसान केले. कोणत्याही वस्तूंच्या किंमती सर्व सामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. आज देशातील गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचे गॅस, खाद्यतेल यासह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून आपल्या व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना मरण यातना भोगायला लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार ला वठणीवर आनन्यासाठी गाव असो शहर असो सर्व जनतेने पेटून उठले पाहिजे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, गृहिणी, अशा सर्वच घटकांना या सरकारने त्रस्त करून सोडले आहे. केंद्र सरकारला जनतेच्या या लोकचळवळीची, आक्रोशाची दखल घ्यावीच लागेल आणि महागाई कमी करावीच लागेल. शेतकर्यांच्या मागण्याही सरकारला पुर्ण कराव्या लागतील. ते पुढे म्हणाले की, विहिरगाव येथे आता पर्यंत आपण जवळपास ७५ लक्ष रुपयांची विकासकामे केली असून येणाऱ्या काळात येथे पांदन रस्ते तसेच अन्य विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार सुभाष धोटे यांनी विहिरगाव येथील ग्रामस्थांना दिली. या प्रसंगी विहिरगाव येथील भाजपचे कार्यकर्ते प्रमोद चौधरी यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, विहिरगावचे सरपंच अॅड रामभाऊ देवईकर, उपसरपंच निळकंठ खेडेकर, जि प सदस्य मेघाताई नलगे, जेष्ठ नेते आबाजी पाटील ढुमने, उध्दव पाटील साडवे, सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, पं स सदस्य कुंदा जेणेकर, तुकाराम मानुसमारे, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, सिंधी चे उपसरपंच रामभाऊ ढुमने, चनाखाचे उपसरपंच विकास देवाळकर, नलफडीचे सरपंच अमित टेकाम, मुर्ती चे सरपंच धनराज रामटेके, मारोती मोरे, सर्वानंद वाघमारे, सुधाकर धानोरकर, मनोहर धुडसे, धनराज चिंचोलकर, रवी होरे, आकाश चोथले, इर्शाद यासह विहिरगाव येथील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहिरगावचे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर यांनी केले, संचालन प्रभाकर साडवे यांनी तर आभार प्रदर्शन ईरशाद शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विहिरगाव काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.