By : Shivaji Selokar
खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाला मोठे यश
चंद्रपूर : वेकोलिच्या नियमानुसार रक्ताच्या नात्याचे कारण दर्शवून भूस्वामींच्या नॉमिनीना अनेक वेळा नाकारले जाते, जावई, नातीन, विवाहित मुलगी इत्यादींना नाकारणे अन्याय असून यात संशोधन करण्याची गरज आहे. असे खासदार बाळू धानोरकर यांनी सुचवले होते. हि मागणी मान्य करीत ज्याची जमीन त्याला नॉमिनी ठरवायचा अधिकार आता असणार आहे. या मागणीला खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठे यश मिळाले आहे.
वेकोली अंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या बदल्यात आजवर प्रकल्पग्रस्तांची विवाहित, अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित मुलींना नोकरीचा हक्क नाकारला जात होता. या अन्याय विरुद्ध खासदार बाळू धानोरकर यांनी कोल इंडिया लिमिटेड कडे जोरदार पाठपुरावा व पत्राचार करून मोठेच यश मिळविले असून यात महिलांना आता वेकोलिच्या नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत कंपनी सेक्रटरी तर्फे WCL / OFFICIAL CS / BM – 337 / 2021-22 567/ दि ९. ११. २१ आदेश निघाले आहे. वेकोलि मुख्यालय नागपूर तर्फे पत्र क्र WCL/ IR/ LO/ 2021/ 1245 दि १६. ११. २१ द्वारे सर्व क्षेत्रीय महाप्रबंधकांना याबाबत सूचना दिल्या गेली आहे.
खासदार बाळू धानोरकर यांनी यापूर्वी विधवा महिलांच्या २ प्रकरणात न्यायालया कडून नोकरीला मान्यता मिळल्याचे उदाहरण चेअरमन कोल इंडिया यांचेकडे सादर करून अशा प्रकारच्या वारसांना नोकरी देण्यासाठी पत्राचार केला होता. त्यानुसार वेकोलिने आता प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा नॉमिनी ठरवायचा अधिकार केवळ भूस्वामींचा असा निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्व वेकोलि कर्मचारी खासदार बाळू धानोरकर यांचे आभार मनात आहे.