लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर–
भारतीय संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा म्हणून १ जानेवारी२०२२ रोजी वयाची १८वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय/ क. महाविद्यालय/ शरदराव पवार महाविद्यालय तसेच राजस्व विभाग गडचांदूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी गडचांदूर शहरातील मुख्य मार्गाने फिरून नागरिकामध्ये मतदानाविषयी जनजागृती केली. सदर रॅलीमध्ये मंडळ अधिकारी नारायण चव्हाण, गडचांदूर साजाचे पटवारी सोहेलअन्सारी , शाळेचे पर्यवेक्षक एस. गाडगे ज्येष्ठ शिक्षक महेंद्र. ताकसांडे, प्रा.डॉ शरद बेलोरकर, प्रा. डी. के. झाडे, प्रा. सुरपाम , सी.जे.घाटे, एस. पाटील , राजस्व विभागाचे कर्मचारी अनिल येमुर्ले, लीलाधर काळे यांचेसह सावित्रीबाई फुले विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांचा समावेश होता. रॅलीचा समारोप सा. फुले विद्यालयात झाला. समारोप कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले,