लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात अनेकांचे पक्षप्रवेश : विकासकामांचे भूमिपूजन.
जिवती :– तालुका काँग्रेस कमिटी जिवती द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची पदनियुकी करून अभिनंदन करण्यात आले. तसेच जिवती तालुक्यातील अनेकांना काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश देण्यात आला. आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महत्त्वाचे नेते जंगू देवी चे पुजारी श्री. दिवाकर बाजीराव वेटी, माजी नगरसेविका सौ. सुनीता दिवाकर वेटी, भाजपच्या कार्यकर्त्या माजी नगराध्यक्षा सौ. पुष्पा नैताम, श्री. शुकलाल कोटनाके, श्री. उत्तम थोरात, श्री. कैलास नरवाडे, सौ. लांडगे मॅडम, सौ. अर्चना पांचाळ मॅडम यासह अनेकांनी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सामन्यातील सामान्य माणसाचे हित जोपासण्यासाठी सर्व समावेशक विचारधारा, संस्कृती आणि भुमिका घेऊन विकास कामे करणारा पक्ष आहे. त्यामुळेच आपण आमदार म्हणून क्षेत्रात लोककल्याणकारी विकासकामे पूर्ण करीत आहोत. जिवती परिसरातील नागरिकांच्या जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न असो की अन्य प्रश्न असोत ते मार्गी लागत आहेत. तर शिल्लक आहेत त्याबाबत शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येत आहे. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी गावागावात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत असने आवश्यक आहे. त्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सातत्याने कष्ट घेतले पाहिजे आणि पक्षाचे विचार, शासनाची विकासकामे, लोककल्याणकारी योजना लोकांना समजावून सांगितले पाहिजे.
तसेच या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नगर पंचायत जिवती अंतर्गत वैशिषटयपूर्ण अनुदान योजने अंतर्गत दत्ता राठोड ते मारेवाड चौक पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे (रुंदीकरण व रस्ता दुभाजक सहित) बांधकाम करणे. अंदाजित किंमत 241.94 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष भिमराव पा मडावी, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सभापती अंजना पवार, माजी नगराध्यक्षा पुष्पा नैताम, नंदू नाईक, मारू पा नैताम, प.स. सदस्य अनिता गोतावळे, सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, सुनिता वेटी, ओ बी सी विभागाचे विष्णू रेड्डी, अल्पसंख्य विभागाचे जब्बार भाई, दत्ता राठोड, सत्तरशाह कोटनाके, दत्ताभाऊ राठोड, भोजू पा. आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग अजगर आली, मारुती मोरे, आशिष ढसाने, सिताराम मडावी, शुकलाल कोटनाके, दत्ता तोगरे, विलास वाघमारे, सुभाष राठोड, विजय राठोड, रामभाऊ चव्हाण, तजुद्दिन शेख, जयश्री गोतावळे, विजय राठोड यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रामाचे प्रास्ताविक माजी नगरउपाध्यक्ष अशपाक शेख यांनी केले. सुत्रसंचलन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कंटु कोटनाके यांनी तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव सिताराम मडावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू रेड्डी, जब्बार शेख, सुनिल शेळके, विजय राठोड, मारोती कुमरे यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.