लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर÷भारतीय जनता पार्टी महिला आघाडी चंद्रपूर ग्रामीण यांचे वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. राणी लक्ष्मीबाई “मै मेरी झाशी नही दूंगी ” असं मनत इंग्रजशी लढली म्हणून आज जयंती निमित्ताने अशाच समाजात शूरवीर असणाऱ्या स्त्रीचा सत्कार करून समाजापुढे राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा ठेवणारी जुनोना तालुका चंद्रपूर येथील अर्चना संदीप मेश्राम ही ताई आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी लढली आणि मुलगी वाचवली. शौचास गेली असता वाघाने मुलीला पकडले मुलीचा तोंड वाघाच्या जबड्यात बघून अर्चनाताई काठीने वाघाशी लढण्यास सुरुवात केली 2 दा वाघाणी मुलीचं तोंड जबड्या पकडलं पण पळ काढेल ती आई कसली “मै मेरी बच्ची नही दूंगी ” असं मनत वाघाशी लढली आणि शेवटी वाघाणी सुद्धा आई समोर हार मानली आणि पळ काढला. या शुभदिनी लढवंय्या अर्चना मेश्राम यांचा” वाघीण आई” सत्कार मा सुधीरभाऊ मुनगंटीवार लोकलेखा समिती अध्यक्ष, तसेच हंसराजजी अहिर माजी केंद्रीय मंत्री यांचे हस्ते करण्यात आले. शाल श्रीफळ शिल्ड साडी चोळी रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचवार संध्याताई गुरनुले अध्यक्ष जी प, देवरावभाऊ भोंगळे अध्यक्ष भाजपा, चंदनशिह चंदेलजी, संजय धोटे माजी आमदार, वनिता ताई कानडे उपाध्यक्ष प्रदेश, अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, विजयालक्ष्मी डोहे महामंत्री, सुनीता म्यॅकळवार उपाध्यक्ष जिल्हा, स्वेता वनकर सचिव जिल्हा, रजिया कुरेशी सचिव, वैशाली बोलमवार, उशारणी वनकर, अरुणा जांभुळकर, स्वाती वडपल्लीवर, भूमी पीपरे, कोमल फरकडे, अश्विनी तोडासे महिला आघाडी उपस्थित होते.