*स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये विकासाचे व्हिजन असावे – खा. बाळूभाऊ धानोरकर*

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕*पिंपळगाव येथे विविध कार्यक्रम*

कोरपना – गावातील सरपंचामध्ये विकासाचे व्हिजन असले तर तो कोणतेही स्रोत शोधून पाठपुरावा करून विकासकामे खेचून आणू शकतो. त्यामुळे गावविकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्षम असावा असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.
कोरपना तालुक्यातील पिंपळगाव येथे श्री. गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष युवा मंच व समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित भागवत सप्ताह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने बांधकाम करण्यात आलेल्या सांस्कृतिक मंचाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
उद्घाटन अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्रीकांत कुंभारे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट ग्राम बिबीचे माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर, जितेंद्र बैस, शैलेश लोखंडे, भास्कर जोगी, आबाजी बोबडे, नानाजी ठाकरे, प्रभाकर जोगी, विठ्ठल बोढाले, खुषाल गोहोकर, विठ्ठल जोगी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार पानघाटे, शामराव केळझरकर, माजी सरपंच रेखा घोडाम, गाडेगाव येथील सरपंच शारदा राजुरकर, भाऊराव बोभाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर धानोरकर यांनी केले. संचालन घनश्याम पाचभाई यांनी केले तर आभार मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष युवा मंच व समस्त पिंपळगाव येथील नागरिकांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *