By : Mohan Bharti
नागपूर : संयुक्त राष्ट्र जागतिक शांतता, सुरक्षितता परिषदेत महाराष्ट्र राज्याचे संचालक पदी जि. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर येथील प्राचार्य डॉ, सॅम्युअल रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. पांडेंचेरी येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सर्वसामान्य सभेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ, रॉय संयुक्त राष्ट्र परिषदेत गेल्या काही वर्षांपासून सक्रीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर शांतता ,सुरक्षितता, आणि सहकार्य या करिता स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ,म्हणजेच यूएनओ, आहेत गेल्या वर्षी भारताची एक वर्षासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेचे अस्थायी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. डॉ, रॉय यांची नियुक्ती झाल्याबद्दल सभापती डॉ, किमकीम,डॉ, सुरेश बाबू,डॉ, रॉबिन रोमई हेनी तथा इतरांनी अभिनंदन केले आहेत.