By 👉Shankar Tadas
नागपूर, ता. १५ – जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भरमसाठ दर, पेट्रोल- डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. शेतकºयांच्या जीवावर वरंवटा फिरविणाऱ्या तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे शेतकºयांचे जिणे कठीण झाले आहे. शेतकºयांच्या सहनशिलतेचा केंद्रातील भाजपा सरकारने अंत पाहू नये, अशा शब्दात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उदासा पंचक्रोशीतील शेतकºयांच्या उपस्थितीमध्ये एल्गार पुकारला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मोदी सरकारच्या विरोधात नागपूर जिल्ह्याच्या आंदोलनाच्या जनजागरण अभियानाला उमरेड तालुक्यातील उदासा येथुन सुरूवात केली. यावेळी शेकडो शेतकºयांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शेतकºयांमधील असंतोषाला वाट करून दिली. डॉ. नितीन राऊत यांनी उदासा गावात रात्रीचा मुक्काम करून शेतकºयांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी मोदी
सरकारमुळे शेतकºयांवर कोसळलेल्या संकटाचा पाढा शेतकºयांनी मांडला.
या अभियानाअंतर्गत उमरेड तालुक्यातील विरली या गावात सकाळी प्रभातफेरी काढून शेतकºयांनी काँग्रेस आंदोलनात सहभाग घेऊन मोदी सरकार विरोधात खंबीरपणे उभे ठाकल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीचे अध्यक्ष व
माजी मंत्री राजेंद्र मुळक, उमरेडचे आमदार राजू पारवे, आमदार अभिजीत वंजारी, उदासा ग्रामपंचायतच्या सरपंच कविता विलास दरणे, नागपूर जिल्हा परिषदेतील सत्तारुढ पक्षाच्या गटनेत्या अवंतिका लेकुरवाळे,राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र
करवाडे, जि. प. सदस्य अरुण हटवार, उपसरपंच विठ्ठल मेश्राम, प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रसन्ना तिडके, आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्याच्या जनजागरण अभियानाची सुरूवात उदासा येथून करण्यात आली. यावेळी रात्री उदासा परिसरातील शेकडो शेतकरी जमले होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे गावात आगमन झाल्यानंतर मोदी
सरकारच्या विरोधात घोषणा देत रॅली गावातील प्रमुख भागातून पायदळ मार्च काढण्यात आला. शेतकºयांच्या हातात काँग्रेसचे ध्वज होते. गावात ठीक- ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधातील घोषणांचे फलक लावण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी मोदी सरकार व काँग्रेसच्या सरकारमधील धोरणात्मक फरकाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. काँग्रेसने देश उभा करण्याचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सुई सुद्धा न बनवू शकणारा देश आता मंगळ ग्रहावर पोहोचला आहे, यामागे नेहरूंची वैज्ञानिक दृष्टी होती. इंदिरा गांधी यांच्या हरीत क्रांतीमुळे देश अन्नधान्यात स्वावलंबी झाला तर राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे देशात संगणक क्रांती आली. या विकासामुळे देश एक शक्ती म्हणून उभा झाला परंतु भाजपने केवळ भावनेच्या आधारावर लोकांना भडकविण्याचे काम केले. दंगली करून जाती व धर्माच्या नावावर लोकांना भिडवण्याचे काम करणाºया शक्तींनी महात्मा गांधी यांचा खून केला. या द्वेषाच्या भिंती समाजात उभ्या करणाºया मोदी सरकारला खाली खेचले नाही तर आपला देश कमजोेर होईल. मोठ्या कष्टाने मिळविलेले स्वातंत्र्य आपण गमावून बसू व एका रानटी काळाच्या गुहेत जाण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी आता आपल्या हिताचे निर्णय घेणारा पक्ष कोणता व धर्माच्या नावावर मते मिळविणारा पक्ष कोणता, याची जाणीव आता देशातील नागरिकांना झाली आहे असेही डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.
उदासा येथील रात्री जनजागरण अभियान व शेतकºयांशी संवाद साधल्यानंतर सोमवारला सकाळी विरली गावात प्रभातफेरी काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात शेतकºयांनी प्रभात फेरी काढली. यावेळी डॉ. नितीन राऊत हे देखील टाळ वाजवित वारकºयांच्या या प्रभातफेरीत सामील झाले. यावेळी अनेक शेतकरी सामील झाले होते. यावेळी संजय मेश्राम, चंद्रभान भिसे, प्रशांत जिचकार, देवाजी जांभुळकर, लक्ष्मण धोबी, मनोहर भोयर, बाळाजी चौधरी, प्रकाश चौधरी, गणपत चौधरी, उषा चौधरी, दीपाली भोयर, सुरेखा भिसे, रंजना भिसे, मनोज हाले, हेमंत कुर्वे, श्रीधर चौधरी आदी उपस्थित होते.