By : Mohan Bharti
सोलापूर दिनांक :- १५/११/२०२१ :- सोलापूर शहरातील शांतता सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व गोर गरिबांचे गैरसोय दूर करण्यासाठी शहरातील बंद केलेले पोलीस चौक्यात कामकाज पूर्ववत चालु करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे मा. पोलीस आयुक्त मा. श्री. हरीश बैजल साहेब यांना देण्यात आले आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहराचे माजी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साहेब यांनी सोलापूरातील सर्व पोलीस चौकीचे कामकाज पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी घेण्याचे कार्यपध्दती सुरू केले. पोलीस चौकीचे तक्रारी घेणे व इतर कामकाज बंद केल्याने सर्व सामान्य गरीब नागरीकांचे गैरसोय होत आहे. त्याच बरोबर तक्रारदारांना वेळेवर न्याय मिळत नाही. इतकेच नव्हे तर तक्रार दारांना गैर तक्रारदार त्रास देणे. व इतर समस्या वाढत आहेत. कारण पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षकांनी तक्रारी वर्ग करण्यास विलंब होतो. आणि पोलीस निरिक्षक हे आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना देतात. त्यामुळे तक्रार दारांना वेळेवर न्याय मिळत नाही. आणि इकडे तक्रारदार तक्रार देऊन कोणाकडे भेटावे हे न समजल्याने गोंधळून जातो. आणि तक्रारी वाढतच जातात अशा प्रकारे नागरीकांचे गैरसोय होतो.
पोलीस चौक्यांचे कामकाज बंद झाल्याने कोणी अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी असे कोणीही त्याठिकाणी राहत नाही. म्हणून शहरातील सर्व पोलीस चौक ओस पडल्या आहेत. त्याच बरोबर पोलीस चौकीच नसल्या सारखे झाले आहे. म्हणून आसपासच्या परिसरात अशांतता, अवैद्य धंदे, गुंडगिरी, फसवणुक, चोरी असे प्रकार वाढले आहे. चौकी चालु असल्यास त्या चौकीच्या किमान १ एक किलो मीटर परिसरात गुन्हेगारांवर एक प्रकारचे वचक होते आणि नागरीकांना आधार वाटे. एकूणच शहरातील सर्व पोलीस चौक्यात पूर्ववत कामकाज सुरू करावे. अशी विनंती करीत आहोत.
तरी मा. पोलीस आयुक्त साहेबांनी वरील विषायांबाबतीत गांभीर्याने विचार करून सोलापूरातील सर्व पोलीस चौक्यांचे कामकाज परत सुरू करावे. ही नम्र विनंती. असे नमुद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाचे प्रत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस विभागीय आयुक्त कोल्हापूर यांना पाठविण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) in यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप, गुरूनाथ कोळी, नागार्जुन कुसूरकर, रमेश चिलवेरी, संजीव शेट्टी यांचा समावेश होता.
●◆■★★■◆●●◆■★★★■◆●
फोटो मॅटर :- सोलापूर शहरातील पोलीस चौक्या पूर्ववत कामकाज चालु करा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्तांना देण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप आदि दिसत आहेत.