By : Mohan Bharti
गडचांदूर : घराचे पेंटींग्जचे कामे करत असताना घराच्या वरून गेलेल्या जीवंत विद्युत ताराला अचानक स्पर्श झाल्याने सिद्धार्थ विहार, गडचांदूरचा अस्थाई मजदूर अविनाश पोचूजी रामटेके हे ९०% जळलेला आहे. त्यांचा सद्या सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.
राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य शाखा गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूरच्या वतीने दिनांक ६ नोव्हेंबर २०२१ जोगेश सोनडूले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाखा गडचांदूरच्या वतीने अस्थाई कामगार अविनाश रामटेके यांना रुग्णालयात समक्ष भेटून ३०००/- तीन हजार रुपयांची मदत करण्यात आली.
मदतीकरीता युनियनचे अध्यक्ष जोगेश सोनडूले, शाखा गडचांदूरचे अध्यक्ष सुनिल फुलझेले, साप्ताहिक विदर्भाचा वीरचे संपादक तथा मजदूर युनियन शाखा गडचांदूरचे सल्लागार प्रभाकर खाडे, देवानंद वाटगूरे, पुरुषोत्तम सोरते, शंकर झुंगरे, शाम खुशालराव ठमके, मोरेश्वर चांदेकर, दिनेश नांदूरकर, महेंद्र गिलबिले, अजय मारोती पाल, रमेश सुदर्शन मडावी, देविदास राघोजी टेकाम, शंकर भगत, प्रियोबाला गावंडे, धनपाल वानखेडे इत्यादीने सहकार्य केले.