_ लोकदर्शन 👉 मोहन भारती
- रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे रेल्वेतून प्रवास करताना, फक्त शुद्ध शाकाहारी जेवणच दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सुविधा निवडक मार्गांवरच मिळणार असल्याचे समजते.
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तर्फे ही माहिती देण्यात आली. शाकाहारी भोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी, धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर शाकाहारी भोजन देण्यासाठी भारतीय सात्विक परिषदेने ‘आयआरसीटीसी’सोबत करार करण्यात आलाय.
*‘सात्विक’ प्रमाणन योजना*
‘आयआरसीटीसी’ ठराविक रेल्वेंना ‘सात्विक प्रमाणित’ करून ‘शाकाहारी अनुकूल प्रवासाला’ प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे. येत्या 15 नोव्हेंबरपासून ‘आयआरसीटीसी’सोबत ‘सात्विक’ प्रमाणन योजना सुरू केली जाणार आहे
दरम्यान, कोरोना काळात रेल्वे सेवा ठप्प झाली होती. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या. मात्र, या काळात रेल्वेतील जेवणाची सोय बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरु करण्यात आली असून, प्रवाशांना पुन्हा एकदा जेवण देण्यास सुरुवात झाली आहे