By : Mohan Bharti
लातूर : (मंगळवार दि.९ नोव्हेंबर २१)
यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून ऊसाचे पिक जोमात आले आहे. या परिसिस्थितीत विलास सहकारी साखर कारखाना आणि मांजरा परिवारातील सर्वच कारखाने कार्यक्षमतेने चालवून अधिकाधिक ऊसाचे गाळप केले जाईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा कायम राखली जाईल अशी ग्वाही देऊन तो भाव मराठवाडयातील उच्चाकी असेल असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. मंगळवार दि.९ नोव्हेंबर रोजी निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ जिल्हयाचे पालकमंत्री ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, त्रिंबक भिसे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजुळगे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजराचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, जागृती शुगरचे व्हा.चेअरमन लक्ष्मणराव मोरे, रेणाचे व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, धनंजय देशमुख, व्हा.चेअरमन शाम भोसले, व्हा चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, उपसभापती मनोज पाटील नवनाथ काळे यांच्यासह मांजरा परीवारातील सर्व संस्थाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगाम शुभारंभ झाला आहे.
ऊस पिकाने संजीवनी होवून शेतकऱ्यांला मदत केली
यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या भागात ऊस पिकांने संजीवनी होवून या भागातील अडचणीतील शेतकऱ्याला तारले आहे. जिल्हयात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली साखर-उद्योग सुरू झाला, साखर उदयोगातून जिल्ह्याचा व मराठवाड्याचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. आज देखील महाराष्ट्रात सगळीकडे ऊस नाही विदर्भात व कोकणात अल्प प्रमाणात ऊस आहे. ऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात जास्तीचा ऊस आहे. यामुळे या भागाचा विकास झाला आहे. मांजरा उभारणीचा इतिहास सांगतांना ते म्हणाले, अभयसिंहराजे भोसले व लोकनेते विलासराव देशमुख हे मंत्रिमंडळात सहकारी होते. लोकनेते विलासराव देशमुख यांनी अजिंक्यतारा कारखाना पाहून लातूर येथे कारखाना उभारला आहे. आज येथील कारखाने सर्वासाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
यंदाच्या हंगामात ८ लाख मेटन ऊस गाळपाचे उदिष्ट
यावर्षी पाऊस चांगला पडला आहे. पाऊस पडल्याने पाणीसाठा वाढला आहे यामुळे ऊस लागवडीला संधी आहे. कार्यक्षेत्रातील ऊसस्थिती पाहता विलास कारखाना युनीट नं. १ ने ८ लाख मेटन तर युनीट २ ने ६ लाख मेटन ऊस गाळपाचे उदिष्टय ठेवावे असे त्यांनी सांगितले.
विलास साखर कामगारांना पदोन्नती व वेतनवाढ
आणि १२ टक्के वेतनवाढ लागू
शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्या नंतर ऊसाचे वेळेत गाळप होणे गरजेचे आहे. कारखाना कार्यक्षमेतेने चालून जास्तीत जास्त गाळप आणि साखर उतारा प्राप्त झाला पाहिजे याकरीता सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कामगार महत्वाचे आहेत. या सर्वांना वेळोवेळी सर्व गोष्टी देण्यात आले आहेत मात्र पदोन्नती आणि वेतनवाढ रखडली होती आता कारखान्यातील १२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर साखर कामगारासाठी शासनाने १२ टक्के वेतनवाढ जाहिर केली आहे, ही वेतनवाढ विलास साखर कामगारांना १ नोव्हेबर पासूल लागू करण्यात येत असल्याचे ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी जाहिर केले.
महिला ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे मेळावे घ्यावे
विलास कारखाना क्षेत्रात ऊसविकासात योगदान वाढावे यासाठी महिला ऊस उत्पादक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक मेळावे स्वतंत्रपणे घ्यावेत. याठिकाणी आधुनिक ऊसशेती संदर्भात माहिती दयावी. यापूढे शेतकऱ्यांनी कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घ्यावेत अशी सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी योवळी केली.
विलास कारखाना सुरू होण्याच्या आठवणींना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी उजाळा दिला
यावेळी बोलतांना लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगीच्या गळीत हंगामाच्या या सोहळ्यात कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याच कार्यक्रमात “शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देणारे एक पवित्र स्थान मी आपल्या सेवेत रुजू करतोय”, असे अमितभैय्यांनी सांगितले होते. आणि आज दोन दशके झाली. तोच कारखाना आज ग्रामीण भागाच्या विकासाची पताका फडकवत आहे.
आदरणीय आई या कारखान्याच्या चेअरमन आहेत. पण, याआधी त्या उत्तम शेतकरीही आहेत. शेतीत अनेक नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यामुळेच मागील गळीत हंगामात विलास कारखान्याला ८१४.२५६ मेट्रीक टन ऊसाचा पुरवठा करुन कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करण्याचा मान मिळवला आहे. व्हीएसआय संस्थेनेही आईंच्या कार्याचा गौरव केला. आईंनी आपल्या कार्यातून अनेक चांगली उदाहरणे सर्वांसमोर ठेवली आहेत. याचा मला आनंद आणि अभिमान आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांनी केले, कार्यकारी संचालक संजीव देसाई, ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कारखान्याच्या गळीत हंगामाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर आभार संचालक अनंत बारबोले यांनी मानले कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी कारखाना परिसराची पाहणी केली.
यावेळी व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक एस.आर.देसाई व संचालक सर्वश्री माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले उपस्थित होते.
चौकट
लोककलावंताना मानधन दिले बददल अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून सत्कार
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोककलावंतांना महाविकास आघाडी सरकारने २५ कोटी रूपये मानधनासाठी दिले म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी ही पालकमंत्र्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
यावेळी कोरोना महामारीत कलावंत व वारकरी अडचणीत आले होते. या परिस्थितीचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने आधार म्हणून २५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पालखी मार्गाला महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, वारकरी संप्रदायसाठी योजना आखून महाविकासआघाडी सरकार त्यांना मदत करेल असेही सांगितले.