लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासह घेतली भेट*
कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. द्वारा बरांज, किलोनी, मानोरा डिप खुल्या कोळसा खाणीशी संबंधीत शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक व स्थानिक ठेकेदार आदि घटकांच्या समस्या निवारणाच्या दृष्टीने पुनर्वसन कराराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्या संदर्भात दि. ६ डिसेंबर रोजी कर्नाटकचे उर्जामंत्री, कर्नाटक पॉवर कार्पोरेशनचे उच्चधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव आदिंची उच्चस्तरीय बैठक घेवुन पुनर्वसन कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला भाग पाडू असे आश्वासन भारत सरकारचे कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले.
दि. ०८ नोव्हेंबर २०२१ रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. च्या भद्रावती तालुक्यातील कोळसा खाणींशी संबंधीत शेतकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या शिष्ट मंडळासह नवी दिल्लीत भारत सरकारचे कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. यांच्यात झालेल्या पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळश्याचे उत्पादन केले जात आहे. या परियोजनेमुळे प्रभावित शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक यांच्यासाठी ही बाब अन्याय कारक आहे. शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिकांच्या विविध समस्यांबाबत १३ ऑक्टोंबर रोजी आंदोलन करण्यात आले. पुर्वी कार्यरत परियोजना प्रभावीत स्थानिक कामगारांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन द्वारा पुनर्वसन करारानुसार नियुक्त पत्र देणे, निर्धारित वेतन देणे, उर्वरित वेतन देणे व कामगारांना अन्य सुविधांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली. पुनर्वसन करारानुसार प्रकल्प बाधीत कुटूंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी व नोकरी मिळत नसल्यास ५ लाख रु. राशी प्रदान करण्यात यावी. बरांज मोकासा, तांडा, चेक बरांज, पिपर बोडी या गावांचे पुनर्वसन करण्याता यावे याकडे देखिल त्यांनी ना. प्रल्हाद जोशी यांचे लक्ष वेधले.
बरांज मोकासा आणि चेक बरांज या गावांचे पुनर्वसन झाल्यामुळे ९५ टक्के कृषीभूमी व रस्ते संपादित करण्यात आले. त्यामुळे ५ टक्के कृषीभूमी सुध्दा प्रभावित झाली आहे. ही जमीन देखील संपादीत करुन शेतक-यांच्या वारसांना नोकरी किंवा मोबदला त्वरित देण्यात यावा असेही आ. मुनगंटीवार चर्चे दरम्यान म्हणाले. बरांज, किलोनी, मानोरा डिप खुली कोळसा खाण परियोजनेमध्ये उपलब्ध स्वंयरोजगारांच्या संधीमध्ये ८० टक्के परियोजना प्रभावित नागरिकांना व स्थानिक बेरोजगारांना काम देण्यात यावे असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. बरांज, किलोनी, मानोरा डिप खुली कोळसा खाण परियोजनेमध्ये स्थानिक ठेकेदार २००८ पासून काम करीत होते परंतु २०१५ ते आजतागायत ठेकेदारांना केलेल्या कामाची शिल्लक रक्कम देण्यात आलेली नाही. ती तात्काळ देण्यात यावी तसेच बरांज, किलोनी, मानोरा डिप खुली कोळसा खाण परियोजनेमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत सुरक्षा कर्मचा-यांना गेल्या वर्षभरापासून सुरक्षा गार्ड कंपनीकडून वेतन दिल्या जात नाही ते वेतन सुध्दा त्वरित देण्यात यावे अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. तर्फे परियोजना प्रभावित ग्रामीण नागरिक, शेतकरी, कामगार व ठेकेदारांच्या मागण्यांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याप्रकरणी जातीने लक्षा घालुन या घटकांना न्याय मिळवुन देत त्यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी ना. प्रल्हाद जोशी यांना केली.
शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक, ठेकेदार यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याबाबत आपण तातडीने ६ डिसेंबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक नवी दिल्लीत बोलावुन पुनर्वसन करारानुसार या घटकांना आपण निश्चितपणे न्याय मिळवुन देवु अशी ग्वाही केंद्रीय कोळसा व खाण मंत्री ना. प्रल्हाद जोशी यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले. यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भद्रावती तालुका भाजपा सरचिटणीस नरेंद्र जिवतोडे, पंचायत समिती भद्रावतीचे सभापती प्रविण ठेंगणे, कामगार प्रतिनिधी संजय ढाकने, बरांज मोकासाच्या सरपंच मनिषा ठेंगणे, चेक बरांजच्या सरपंच प्रभा गडपी, रमेश भुक्या, अफजलभाई, आकाश वानखेडे, माधव बांगडे, संतोष नागपुरे, सुधीर बोडाले, श्रीराम महाकुलकर, लक्ष्मण भुक्या, विठोबा सालुरकर, गिरीजा पानघाटे, परवेज सौदागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रकरणी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी ना. प्रल्हाद जोशी यांचे आभार मानले.