By ÷, Shankar Tadas
नागपूर, ७ नोव्हेंबर २०२१ :-
उत्तर नागपूर येथील पी.डब्लू.एस. महाविद्यालय, टेका, कामठी रोड नागपुर येथे ब्लाँक १३च्या वतीने दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाँ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. संसर्ग कमी झाल्यामुळे कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा धोका असल्यामुळे सण-उत्सव साजरे करता आले नाही त्यामुळे भेटीगाठी व्हाव्या या उद्देशाने स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि चैतन्याचा उत्सव आहे. या सणानिमित्त आपल्या परिवारातील सदस्य असलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने दिवाळी मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांनी फराळ आणि अन्य आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कृष्णकुमार पांडे, संजय दुबे, रत्नाकर जयपुरकर, ठाकुर जग्यासी, सुरेश पाटिल, दिपक खोब्रागडे, हरिभाऊ किरपाने प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी साहेबराव सिरसाठ, जयंत जाभुळकर, सतीश पाली, गौतम अंबादे, तुषार नंदागवळी, बंडोपंत टेंर्भुणे, विनोद सोनकर, उत्तरेश वासनिक, सचिन जाडो, माणीक वंजारी, सप्तश्रृषी लांजेवार
महेंद्र बोरकर, विजया हजारे, ममता सयाम, हिरा गेडाम सह नागरिक उपस्थित होते.