लोकदर्शन 👉 मोहन भारती
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी शनिवारी सुनावण्यात आली होती. पण, ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आता त्यांना पुन्हा पाच दिवसाची ईडी कोठडी देण्यात आली आहे.
त्यामुळे देशमुख यांना १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीतच रहावे लागणार आहे. देशमुखांना काल न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे ते एक दोन दिवसासाठी जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता होती. पण, त्यांच्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्यांना पुन्हा पाच दिवसाची ईडी कोठडी देण्यात आली आहे.